Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

MMRDA च्या निष्काळजीपणामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, एक जण जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मनोर, 7 एप्रिल :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली पाडोस पाडा तेथे भीषण अपघात झाला आहे. एक ओमनी कारने हायवेवर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या आपघातात ओमानी कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे MMRDA ने कामासाठी निष्काळजीपणे हायवेवरच कंटेनर उभा ठवल्याने कार चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनास्थळी मनोर पोलीस आणि महामार्ग पोलीस दाखल झाले असून, सदर अपघातात मृत्यू झालेल्या चालकाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दूसरीकडे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर MMRDA च्या या निष्काळजीपणा बद्दल वाहन चालक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.