Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथल्या संतोष गायधने यांनी अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार असा इशारा दिलाय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

श्रीरामपूर, 12 एप्रिल : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर येथील निपाणी वडगाव संतोष गायधनी या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. शेतीच्या वादातून संगनमताने कुटूंबावर अन्याय झाल्यानंतर संतोष गायधने याच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. खोट्या केसेस दाखल केल्या जात असून कुटुंब भीतीच्या छायेखाली जगतंय. अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस अन् मंत्र्यांनाही निवेदन दिलं तरी काहीच होत नसल्याने गायधने यांनी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा दिला.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावात संतोष गायधने यांची शेतजमीन आहे. या शेतीच्या वादातून 96 जणांनी मिळून गायधने कुटुंबावर दबाव आणला आहे. विविध मार्गाने खोट्या केसेस दाखल करुन कुटुंबाचा मानसिक छळ सुरु आहे. त्यामुळे कुटुंब दहशतीखाली जगत आहे. शेती वाद आणि खोट्या केसेस या भीतीने गायधने कुटुंबाने टोकाची भूमिका घेतली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अण्णा हजारे यांना निवदेन देऊनसुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने गायधने कुटुंब संतप्त झालं आहे. त्यातून या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्याचसोबत 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगणसिद्दीत जाऊन हत्या करणार असा इशारा संतोष गायधने याने दिला आहे.अण्णा हजारे यांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अण्णा समर्थकांनी केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.