Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढणार

अनेक राज्यात पारा 42 अंशावर जाण्याची शक्यता

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

Weather News, 19 मे –  राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस  तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  देशातील अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले  आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या आढवड्यापासून उष्णतेने कहर होत असल्याचे चित्र आहे.

वामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअल आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये देखील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच जोधपूर, बिकानेरमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपूर शहरात काल 18 मे रोजी कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. तर किमान तापमान 27.2 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.आगामी 19 मे ते 21 मे या कालावधी मध्ये हवामान कोरडे असून तापमानात 2-3 अंश सेल्सिअस ने वाढ होण्याचा अनुमान नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे देण्यात आला आहे. आवश्यकता नसल्यास दुपारी घरा बाहेर न पडण्याचे नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.