Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 23 मे – महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्य हा उपक्रम राबविला जाणार असून ग्रामपंचायतीअंतर्गत दोन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. यासाठी महिलांना ग्रामपंचायतीकडे 27 मे पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे. व 28 मे ला पुरस्कार करीता निवड झालेल्या व्यक्तींचे नावे जाहिर करण्यात येईल.

प्रत्येक गावांत दोन महिलांचा गौरव- ग्रामपंचायत स्तरावर दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी महिलांनी 27 मे पर्यंत ग्रा.प.मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. निकष- पुरस्कारासाठी संबंधीत महिला ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. त्याच क्षेत्रात संबंधीत महिलेने उल्लेखनीय कार्य करणे आवश्यक आहे. पुरस्काराचे स्वरुप- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच प्रती महिला रोख 500/- रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्य 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवड समिती- ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती स्थापन करावी लागेल.अर्ज कोठे, व कधी पर्यंत करायचे- ग्रामपंचायत स्तरावरील महिलांनी संबंधीत ग्रामपंचायतीमध्ये 27 मे 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक होते. त्याच भागातील महिलांना अर्ज करता येत होते. या महिलांना मिळणार प्राधान्य- बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसाहाय्यता बचतगट, आरोग्य साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या क्षेत्रात काम केलेल्या महिलांना पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाईल.
ग्रामपंचायतींना दोन हजार रुपये खर्चाची मर्यादा- अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत दोन हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

सदर खर्च ग्राम पंचायत उत्पन्नाच्या महिला व बाल कल्याण अंतर्गत 10 टक्के निधीतून हा खर्च करणे आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी सदर पुरस्काराकरीता आपले अर्ज ग्रामपंचायतला दिनांक 27 मे पर्यंत सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.