Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्लीत पद्मभुषन अण्णा हजारे यांच्या वाढदिवस गरीबांना वस्त्रदान करून साजरा.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 15 जून – जेष्ट समाजसेवक तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे प्रणेते पद्मभुषन अण्णा हजारे यांचा 86 वा वाढ-दिवसा निमित्त आलापल्ली येथील अत्यंत गरीब होतकरु महीलाना नविन साळीचोळी भेट देऊन,अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना व त्यांचे सोबत असलेल्या नातेवाईकाना फळे, बीस्कीटाचे वाटप करण्यात आले. राज्य समिती विश्वस्त डाँ. शिवनाथ कुंभारे यांचे मार्गदर्शनात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे महीला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई कोमलवार, अहेरी तालुका अध्यक्ष ऋषी सुखदेवे, स्वराज्य फाऊँडेशन आलापल्लीचे कार्यकारी मंडळ, माजी नगराध्यक्ष सौ.हर्षाताई ठाकरे, महेश मुक्कावार,रविन्द्र ठाकरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते अहेरी,

तसेच व्रुक्षारोपन करुन अण्णा हजारे यांचे जिवन चरीञ व त्यांचे समाज व देशहिता करीता केलेल्या महान कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले.अण्णा हजारे यांचा जिवन सर्वसामान्य जनतेच्या हिताकरीता संघर्षमय राहीला.त्यानी राज्यव्यापी व देशव्यापी अनेक आंदोलन उभारले ज्या आंदोलनातुन ग्रामसभा,माहितीचे अधिकार,दप्पर दिरंगाई,नागरीकाची सनद,लोकायुक्त,लोकपाल,ग्रमसंरक्षक दल,बदली विनिमयाचा कायदा असे अनेक कायदे तयार झाले.देशातील भ्रष्टाचार समुळ नष्ट व्हावा या करीता अण्णानी आपले उभे आयुष्य समाजसेवे करीता खर्ची घातले त्या लोकप्रिय अण्णा हजारेचा 86 वा वाढ-दिवस साजरा करताना आम्हा कार्यकर्त्याना तथा उपस्थीताना अत्यंत आनंद होत आहे. असे मत मार्गदर्शनातुन गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अण्णा हजारे यांना उदंड दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देत अहेरी,आल्लापल्ली येथे पद्मभुषन अण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या वेळी अहेरी तालुका प्रमुख रुषी सुखदेवे,रविन्द्र ठाकरे, स्वराज्य फाऊँडेशनचे अध्यक्ष सागर रामगोणवार,उपाध्यक्ष आदर्श केशनवार, मोहन मदने, तुषार सहारे, प्रतीक खरवडे,क्रुणाल वर्धनलवार,साई बेजलवार,शिवम मुप्पीडवार , संकेत मेश्राम,अरव्न्द ईष्टाम,अमन पितुलवार,रुपेश श्रीरामवार,योगेश कन्नाके,पवन गुडलावार,विनयकुमार मुत्यालवार,स्वाप्निल कोतकोंडावार,अनिकेत निमलवार,प्रथम कोरेत,आदीत्य खरवडे,गौरव लुथडे,सुचित जंबोजवार,मयुर ञिनगरीवार,रुपेश श्रीरामवार, या सह अनेक मंडळी उपस्थीत होते. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :- 

Comments are closed.