Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्याआदर्श पदवी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 जून –  गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज व शोध ग्राम सर्च या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण समाजात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम ‘स्पार्क ‘या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत समाजात एकरूप होऊन काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिता पेसा कायद्याची महत्त्वकांक्षा विशद करत मादक द्रव्य समितीचे कार्य विशद करण्याच्या उद्देशाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उद्या २२जूनला , सकाळी १० वासता करण्यात आलेले आहे.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन ,अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे ,अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली, प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले ,सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे यांच्या उपस्थिती होणार आहे. सदर कार्यशाळा पेसा कायदा व मादक द्रव्य समितीतून दारूबंदी ,पेसा कायदा मीडिया व बातम्या ,पेसा कायद्याची ग्रामसभेमध्ये उपयुक्तता या विषयावर होणार आहे.
या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ता डॉ. सतीश गोगुलवार , केशव गुरनुले , पत्रकार सुमित पाकलवार हे कार्यशाळेचे मार्गदर्शक राहणार आहेत. तरी सदर कार्यशाळेला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य मॉडेल डीग्री कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ डॉ. शशिकांत आस्वले यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.