Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग; साई कुमार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या प्रतिनिधींनी, त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. डिसेंबर २०१४ मध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून मान्यता मिळाली आणि २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. त्यानंतर गेली नऊ वर्ष २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय.

गडचिरोली, 21 जून – : एटापल्ली येथील  सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या वतीने  जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुरजागड लोहखनिज प्रकल्प आणि हेडरी येथे मोठ्या उत्साहात सकाळी ६:00 वाजता पासून योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेडचे साई कुमार, दीपक सिंग गणेश शेट्टी, मोसिन खान तसेच प्रकल्पाचे  वरिष्ठ अधिकारी, कामगार, शेकडो गावकऱ्यांसह विद्यार्थी योग प्रेमी या भव्य योग शिबिरात सहभागी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साई कुमार यांनी केले योग शिबिरात मोलाचे मार्गदर्शन.

या वर्षी जागतिक योग दिनाचे सूत्रवाक्‍य ‘वसुधैव कुटुंबकम करिता योग’ असे आयुष मंत्रालयाकडून प्राप्‍त झाले असून दिलेल्या दिशा-निर्देशानुसार प्राणायाम व योगाभ्‍यास करण्‍यात येत आहे.निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे, भारतात प्राचीन काळापासूनच परंपरा असून ज्ञान प्राप्त करण्याबरोबर शरीर व मन निरोगी राखण्यासाठी योगसाधना अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आजतागायत या विविध साधना गुरु शिष्य परंपरेने संवर्धित केल्या आहेत. योग साधनेमुळे विकार दूर होऊन मन संस्कारक्षम होते त्याचबरोबर योग अभ्यासामुळे जीवनमूल्ये संतुलित राहतात असे प्रतिपादन साई कुमार यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

योग शिक्षक दिलीप बुरांडेनी योगाचे महत्व दिले पटवून.

योग शिक्षकांच्या‍ माध्यमातून योगा प्रात्य‍क्षिक घेण्यात आले यावेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहन चालक,कामगार,विद्यार्थी तसेच योग प्रेमी या भव्य योग शिबिरात 600 जणांनी सहभागी योग प्रेमीना लॉयड्स मेटल्सच्या वतीने टी शर्ट देण्यात आले होते. याशिवाय योगाभ्यासाची सांगता होताच उपस्थितांना फळं शीतपेय देण्यात आले.

हे देखील वाचा,

 

Comments are closed.