Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वडसा (देसाईगंज), रेल्वे स्टेशन चा पुर्णविकासाचा उद्घाटन संपन्न

अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत वडसा रेल्वे स्टेशन चा मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी द्वारा व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातुन शिलान्यास करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

वडसा 6 ऑगस्ट 2023 :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातून आज अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत वडसा (देसाईगंज) या रेल्वे स्थानकांचा आज आभासी पद्धतीने पुनर्विकास चा शिलान्यास संपन्न झाला. या वेळी  केंद्रिय रेल्वे मंत्री मान.अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री मान. रावसाहेब दानवे,राज्यमंत्री दर्शनाताई यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

अमृत भारत कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे,वेटिंग, हॉल,मोफत वाय-फाय, यासारख्या नागरिकांच्या आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत.वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी ‌नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५०८ रेल्वे स्टेशन चा समावेश आहे.यामध्ये महाराष्ट्रात स्टेशन ४४ असुन या अमृत भारत रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासाचा शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला.यापैकी खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नाने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा (देसाईगंज),आमगांव येथे अमृत भारत स्टेशन समाविष्ट करण्यात आहे. जिल्हातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा(देसाईगंज) आहे.या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठया प्रमाणात होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, उपप्रबंधक अशोक सुर्यवंशी साहेब,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,माजी नगराध्यक्षा शालुताई दडवंते,पद्मभूषण पुरस्कृत डॉ. परशुराम खुणे, अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे,ओबिसी प्रदेश सरचिटणीस संगीता रेवतकर,युवती प्रमुख प्रिती शंभरकर, ता.अध्यक्ष नंदु नाकतोडे,ता.अध्यक्ष अनिल शेंडे,युवा ता.अध्यक्ष पंकज खरवडे, ॲड.उमेश वालदे,उल्हास देशमुख,रवि गोटेफोडे जी, साकेत भानारकर, विनोद देओजवार, अनिल कुनघाडकर, अनिल पोहनकर, केशव निंबोंड, वसंता दोनाडकर,प्रमोद झिलपे,ओमकार मडावी तसेच हजारोंच्या मोठया संख्येने नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.