Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाचे उद्घाटन

नट हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो: डॉ.परशुराम खुणे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 6 ऑगस्ट 2023 : नाट्य अभिनयाची ही गंगा प्रशिक्षणाच्या माध्यमातून गडचिरोलीत आणली. चांगले जाणकार प्रशिक्षक विद्यार्थ्यांसाठी इथे आले आहेत. प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक असते. तुमच्यात असलेले सुप्त गुण हे प्रशिक्षक बाहेर काढतील. कलावंत हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो असे प्रतिपादन जेष्ठ झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी केले . गोंडवाना विद्यापीठात निशुल्क राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नूकतेच पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, झाडीपट्टी कलावंत मनोहर हेपट, आईस बालाजी इन्स्टिट्यूट मुंबईच्या लक्ष्मी रावत, कार्यशाळेच्या संचालिका संगीता टिपले तसेच नाट्य कलावंत कार्यशाळा समन्वयक अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. कावळे म्हणाले, येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ३० विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे. येथील मुलांमध्ये खूप पोटेन्शिअल आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे असे मत कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली आणि लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सहकार्याने ४ सप्टेंबरपर्यंत एक महिन्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.