Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीसांनी केला 1,75,000/- रुपयांचा अवैद्य दारु जप्त

जिमलगट्टा पोलीसांनी केली मोठी कारवाहीत तीन आरोपीना अटक, एक आरोपी फरार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,18 सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी रविवारी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली असता सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोड्या (किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी याचे घरी अवैधरित्या विना परवाना मोठ्या प्रमाणात रॉकेट देशी दारु चे साठा करुन वेगवेगळे दारु विक्रेते याना व चिल्लर विक्री करीता साठवून ठेवली आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने जिमलगट्टा प्रभारी अधिकारी संगमेश्र्वर बिरादार यांनी  बक्का बोडका तलांडी यांचे घरी जावुन घरात  मोठ्या प्रमाणात कागदी काटुन बॉक्स आढळुन आले.

कागदी काटुन बॉक्स मध्ये  रॉकेट देशी दारु संत्रा 90 एम.एल. क्षमता असलेले मद्याने भरलेले सिल बंद प्लास्टिक बॉटल आढळुन आले. एका कागदी काटुन बॉक्समध्ये 100 नग सिल बंद प्लास्टिक बॉटल याप्रमाणे 50 कागदी काटुनमध्ये 5000 नग सिल बंद प्लास्टीक बॉटल असुन प्रती नग 35/- रु. प्रमाणे 1,75,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मुद्देमालाबाबत तलांडी यांच्याकडे विचारणा केली असता, सदरील अवैध दारुचा साठा आदेश सत्यप्रकाश यादव, रामनरेश साहेबसिंग यादव व  मनोज मुजुमदार यांनी विक्री करीता माझ्याकडे साठवुन ठेवले असल्याचे सांगीतले. यावरुन आरोपींचा गावात शोध घेतला असता, आरोपी नामे रामनरेश यादव हा मिळुन आला असून आरोपी आदेश यादव हा पळुन जाण्यात यशस्वी झाला. सदर गुन्ह्राचा पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करत आहेत.

हे पण वाचा 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.