Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलिसांनी घेतला 300 हरवलेले मोबाईलचा शोध

तब्बल ४० लाख किमतीचे जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले, नागरिकांनी मानले आभार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,18 सप्टेंबर 2023 :-  मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकर शोध घेत गडचिरोली सायबर पोलीस चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकर घेण्यात आला. सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले  एकुण 150 मोबाईल ज्यांची किंमत जवळपास 22 लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवुन ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले.

या वर्षी एकुण 135 मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 18,80,975/- रुपये एवढी आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते 64 मोबाईल संबधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यातिश देशमुख, सायबर पोलीस प्रभारी उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हरवलेले मोबाईल संबंधिताला परत करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. हरवलेले मोबाईल सापडल्याने संबंधितांनी आनंद व्यक्त करीत गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एकदा हरवलेला मोबाईल सापडत नाही, ही भावना मनातून काढून टाकत तत्काळ तक्रार केल्यास मोबाईल परत मिळू शकतो, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन आर्थिक फ्रॉड झाला असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी. यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

हे पण पहा 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.