Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिमलगट्टा पोलीसांची मोठी कारवाही दहा चाकी वाहनासह 25,00,000/- रुपयांचा अवैध दारु जप्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 16 सप्टेंबर : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर, उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलीस स्टाफ यांनी सापळा रचुन आरोपी नामे कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याचे ताब्यातुन अशोक लेलँड कंपनीची दहा चाकी माल वाहतुक वाहन क्र. एम. एच. 40 सी. डी. 3530 किंमत अंदाजे 15,00,000/- रु. (अक्षरी पंधरा लाख रुपये),रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे 270 बॉक्स किंमत अंदाजे 10,00,000/- रु. (अक्षरी दहा लाख रुपये) चा असा एकुण 25,00,000/- रु. (अक्षरी पंचवीस लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीवर उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली सपोनि. संगमेश्वर बिराजदार हे करत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख  यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिरादार, पुजा गव्हाणे, ज्ञानेश्वर कोल्हे, आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच यावेळी पोलीस अधीक्षकनीलोत्पलयांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रानटी हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा कर्मचारी ठार..

Comments are closed.