Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानटी हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा कर्मचारी ठार..

रानटी हत्तीमुळे नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 16 सप्टेंबर : वडसा वन विभागात येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव वन कक्षात हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे.

मृतक वाहन चालकाचे नाव सुधाकर बापुराव आत्राम (५२) आहे. उपवनसंरक्षक यांच्ये गाडीचे वाहन चालक होतें.मागील वर्षापासून रानटी हत्तीच्या कळपाने देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी परिसरात उच्छाद मांडला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास डोंगरगाव, पळसगाव परिसरातील शेतात प्रवेश करून  हत्तीच्या कळपाने नासधूस सुरू केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे  पळसगाव वनकक्षात रानटी हत्ती आल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला देताच वनकर्मचारी आणि स्थानिकाच्या  मदतीने रानटी हत्तींना पळवून लावण्याचा डाव होता तसे प्रयत्न करीत असताना बिथरलेल्या कळपातील हत्ती सैरावैरा पडू लागले. त्यावेळी स्थानिक नागरिक, कर्मचारीही प्रयत्न करीत होते . मृत वाहन चालक आपली वाहन रस्त्याचा कडेला ठेवून समोरून पाहत असताना अचानक जंगलातून त्यांच्या दिशेने रानटी हत्ती समोर आला असता जवळील नागरिक पडून जाण्यात यशस्वी झाले मात्र त्या ठिकाणी वाहन चालक सुधाकर आत्राम खाली पडल्याने एका हत्तींने वाहन चालकाचा जागीच ठार करून फुटबॉल सारखे फेकून दिल्याने शरीराचे तुकडे झाले. त्यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी , स्थानिकांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने रानटी हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले.

ओडिसा राज्यातून आलेल्या हत्तींनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात वर्षभरापासून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. वर्षभरात एका वृद्धाचा रानटी हत्तीने जीव घेतला आहेत तर काहीना जखमी केलेआहे . त्यामुळे स्थानिक नागरिक आपला जीव मुठीत घेवून जगावे लागत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आधीच या भागात वाघाने कित्येकाचे जीव घेतले असल्याने संकट निर्माण झाले होते. अशातच रानटी हत्तीचे नागरिकावर होणारे हल्ले, उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रानटी हत्तीने वन कर्मचाऱ्याचा जीव घेतल्याची घटना  वाऱ्यासारखी पसरली आहे. तर कित्येक स्थानिक घटनेचे साक्षीदार झाले आहेत. वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर रानटी हत्तीने वाहन चालकाला ठार केल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर घटनेची माहिती होताच वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वडसा पाठविण्यात आले आहे.

 मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक सालविठ्ठल सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण , वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, आदी कर्मचारी सहकार्य करीत आहे.

 

हे पण वाचा :-

Comments are closed.