Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तान्हा पोळ्यातून बालकांनी जपली सर्जेरावाची “संस्कृती”- पोलीस निरीक्षक काळबांधे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 16 सप्टेंबर : लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाही. त्यांना आवरू शकत नाही. त्यामुळे सर्जेरावाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी लहान बालकांनी लाकडी बैलांना सजवून त्यांना तान्हा पोळ्यात सहभाग केल्याचे प्रतिपादन अहेरीचे पोलीस निरीक्षक काळबांधे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले.

स्थानिक कन्यका माता परमेश्वरी देवस्थानात तान्हा पोळा उत्सव समितीद्वारे आयोजित सजावट स्पर्धेत बक्षीस वितरक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विनोद भोसले, समितीचे अध्यक्ष मुरलीधर मद्दीवार, सचिव विनोद विश्वनादुलवार, परीक्षक म्हणून एस के नागुलवार तसेच कवीश्वर हे उपस्थित होते. मागील पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या तान्हा पोळा उत्सव समितीत यावेळी 63 लहान मुलांनी आपले नंदीबैल सजवून विविध सामाजिक समस्यांचे देखावे यातून स्पर्धेत दर्शविण्यात आले. यात चांद्रयान मोहीम, राजनगरीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, भंगार बसेस चे वर्णन, अहेरीत नसलेले स्वतंत्र शौचालय,दवाखान्यातील डॉक्टर ची कमतरता, नेते तुपाशी व जनता उपाशी, खनिज संपत्ती आहे पण उद्योग नाही व इतर समस्यांचे नागरिकांना दर्शन बैल सजावटीतून घडविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पर्धेत प्रथम स्पर्श मांडवकर, द्वितीय भूमी नितीन दोनतूलवार तर तृतीय बक्षीस सक्षम प्रतीक मुधोळकर यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक रेयार्थ आत्राम व लियारा सुमित मोहूरले यांना मिळाला.
स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. बालकांच्या उत्सवाला प्रेरणा देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व नागरिक यावेळी उपस्थित होते. माता कन्यका मंदिरात झालेल्या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पूल्लूरवार तर आभार अनिल चिलवेलवार यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.