Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन होणार उत्साहात साजरा तसेच करण्यात येणार विविध पुरस्काराचे वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 गडचिरोली, 30 सप्टेंबर : २ ऑक्टोबर २०११ हा दिवस विद्यापीठाचा वर्धापन दिन म्हणुन साजरा केला जातो. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यापीठ १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत १३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने विविध पुरस्काराचे वितरण तसेच परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३, दुपारी १२.०० वाजता, महाराजा सेलिब्रेशन हॉल ऍन्ड लॉन, माडीया तुकुम, धानोरा रोड, सिटी हार्ट हॉटेल जवळ, येथे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , महाराष्ट्र राज्य, चंद्रकांतदादा पाटील मुख्य अतिथी अन्न व औषधी प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदी उपस्थित राहणार आहे .
“मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , चंद्रकांतदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात येणार अमृत कलश “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करावयाची असल्यामुळे सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. गोंडवाना विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयानी “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमा अंतर्गत जमा केलेल्या मातीचा अमृत कलश गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , चंद्रकांतदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जीवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण तसेच विद्यापीठ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
जीवनसाधना गौरव पुरस्कार आम्ही आमच्या आरोग्यासाठी तथा सामाजिक कार्यकर्ता, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली संयोजक डॉ. सतिश वसंतराव गोगुलवार,

उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार- छत्रपती नगर, तुकूम, चंद्रपूर जि. चंद्रपूर,अधिसभा सदस्य संजय बलवंतराव रामगीरवार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार- निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती,

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार- प्राचार्य, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, डॉ. प्रमोद मुर्लीधर काटकर,

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय)-आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) ता. वडसा जि. गडचिरोली , सहयोगी प्राध्यापक, डॉ. हितेंद्र धोटे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, वर्ग ३ (विद्यापीठ) निम्नश्रेणी लिपीक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, भिमराव ज्योतिराव उराडे,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ३ (महाविद्यालय) प्रयोगशाळा सहाय्यक जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, प्रशांत बाजीराव रंदई,

उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार , वर्ग ४ (महाविद्यालय) प्रयोगशाळा परिचर जनता महाविद्यालय, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, योगिता प्रकाश रायपुरे,

उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार- आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर, अभिजित किसन अष्टकार,

उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार- गोविंदराव मूनघाटे कला व विज्ञान महाविद्याल, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली ,डिंपल रमेश बोरकर

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार, कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक यांचा शाल, श्रीफळ तसेच विद्यापीठाचे संचालक डॉ. श्याम खंडारे , प्राचार्य ,केवळरामजी हरडे महाविद्यालय ,चामोर्शी डॉ.हिराजी बनपूरकर तसेच वार्षिकांक स्पर्धे मध्ये प्राविण्य प्राप्त महाविद्यालयाना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.