Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीच्या राजाला नागरिकांचा अखेरचा निरोप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 30 सप्टेंबर : दहा दिवस चाललेल्या गणेशाची सांगता गणेश विसर्जनाने करण्यात येते. राजनगरीच्या राजमहालात माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव महाराज यांच्या पुढाकाराने आहेरीचा राजा गणेशाचे विसर्जन ढोल, ताशा व आदिवासी नृत्यांच्या गजरात नदी घाटावर करण्यात आले.

तत्पूर्वी गणेशोत्सवात विविध स्पर्धांत नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. यात एकल व समूह नृत्य, आदिवासी नृत्य, गायन स्पर्धा व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतून तीन उत्तम स्पर्धकांना राजघराण्याकडून रोख रक्कम तसेच भेटवस्तू देऊन निवड झालेल्याना गौरविण्यात आले.
विसर्जनात धामणगाव येथील बँड पथक, तेलंगणातील आदिवासी नृत्य कलाकारांसह गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबादी व गणेश भक्तांच्या जोरावर रात्री पावसाच्या सरी आल्या तरी दानशूर चौक, आजाद चौक, मज्जिद चौक, पोलीस स्टेशन चौक ते बस स्टॉप मार्गे नदी घाटावर गणरायाला ‘पुढल्या वर्षी लवकर या’ निनादाने विसर्जित करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी राजेसाहेबांसोबत डॉ. मनोरंजन मंडल, प्रकाश गुडेलिवार, संतोष उरेते, गिरीश मद्देरलावार, अनिल भोंगळे, संजय कोडेलवार, मधुकर वांढरे, तालिब सय्यद, अरुण गोटेफोडे, युवराज करडे, नगरपंचायतीचे नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, विविध समाजाचे राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती यांनी विसर्जनात सहभाग घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.