Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 अहेरी, 30 सप्टेंबर : स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन नुकताच प्राचार्य डॉ. एम के मंडल यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा.रमेश हलामी होते.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी ची स्वतःत जपणूक करावि व त्या अनुषंगाने सामाजिक कर्तव्य करावे, दिन दुबळ्याची सेवा करावी, रासेयोच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास करावा व आदर्श नेतृत्व गुण अवगत करण्याचा प्रयत्न करावे .या माध्यमातून तुम्हाला जीवनात उत्तुंग भरारी घेता येईल .तरी सर्वांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःत आवश्यक ते गुण अवगत करावे असे मार्गदर्शनात व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाधिकारी जेष्ठ प्राध्यापक प्रा. तानाजी मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, संकल्पना, युवकाची कार्य, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी प्रा.शामल विश्वास प्रा.कांचन दुर्वे यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.अतुल खोब्रागडे व आभार प्रदर्शन प्रा.राठोड यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शशिकांत गावंडे दुलाल ,राजेंद्र हडपे यांनी अथक परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.