Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डहाणूत नवजात बालकांसाठी अद्यावत अतीदक्षता विभाग..!

नवजात बालकांना मिळणार वेळेवर योग्य उपचार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

मनोज सातवी/डहाणू , 21 मार्च – डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी अद्ययावत अशा अतीदक्षता विभागाचे आज लोकार्पण करण्यात आले. अदाणी इलेक्ट्रिसिटी, अदाणी फाउंडेशन आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने या सुसज्ज अशा अतीदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी 22 नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि मातांसाठी 9 रेस्ट बेड, 2 व्हेंटिलेटर, 2 बबल मशीन, 3 led photo therapy मशीन अशी व्यवस्था येथे आहे. त्यामुळे आता डहाणू – तलासरी तालुक्यातील नवजात बालकांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू टाळता येणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी आधी नवजात बालकांसाठी केवळ उपचार केंद्र होते. मात्र आता संयुक्त प्रयत्नाने त्याचे रूपांतर सुसज्ज अतिदक्षता विभागात झाले आहे. या विभागातील बालमृत्यूची संख्या पाहता अशा अतिदक्षता केंद्राची मागणी नागरिक करत होते.

डहाणू परिसरात नवजात बालकांसाठी अतिदक्षता केंद्र नसल्यामुळे तेथे महिन्याला तीन ते चार नवजात बालकांचा मृत्यू होतो. ही परिस्थिती पाहून तेथील तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी अशा उपक्रमासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनशी संपर्क साधला. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अदाणी फाउंडेशन ने तातडीने हालचाल करून या केंद्रासाठी निधी मिळवून दिला आणि केंद्राची उभारणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या लोकार्पण सोहळ्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी, डहाणूच्या पोलीस उपविभागीय अधिकारी अंकिता कणसे, अदानी थर्मल पावर स्टेशनचे सीओओ राजेंद्र नंदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड, डहाणूची तहसीलदार अभिजीत देशमुख, डॉक्टर बालाजी हिंगणे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.