Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत शेतकऱ्याच्या विविध समस्या संदर्भात तहसिलदारानां दिले निवेदन

Get real time updates directly on you device, subscribe now.

वरोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांचा पुढाकार .

वरोरा ०७ डिसेंबर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष  अभिजित कुडे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदार यांना  निवेदन देण्यात आले . यावर्षी  अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  सोयाबीन त्या पाठोपाठ कापुस पिकावर सुध्दा बोंडअळी आणी बोंडसळ या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडला  आहे शेतकऱ्यांचे जिवन जगणे कठीण झाले आहे पुढे परिवाराचा उदरनिर्वाह करायचा कसा? पोरांचे समोरचे शिक्षण करायचे कसे अश्या अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाले आहे .आधीच शेतकरी चिंतातूर होता आणि  त्यात हि शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज डोक्यावर मोठे ओझे निर्माण केले आहे. शेतकरी राबराब राबून आपल्याच पिकाला योग्य दर मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे झाला असला तरी शेती सोडता येणार नाही त्यांना पुन्हा शेतीसाठी उभे व्हावे लागणार त्यासाठी कृषीपंपसह उच्च दाबाचा विज पुरवठा देन्यात यावा

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

.यासर्व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखालील तहसिलदाराना निवेदन देन्यात आले यावेळी , गणपत भडगरे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, पंकज मांडवकर , ऋषिकेश कुडे, ऋषिकेश पाटील, संकेत वानखेडे आणि शेतकरी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.