Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ ….

मुंबईत पेट्रोल 90.34 तर डिझेल 80.51 रुपये प्रतिलिटर दर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 7 डिसेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामध्ये लग्नसराईचे दिवस या काळात पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ झाल्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर वाढल्यानं इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस गगनाला पोहोचले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 73.83 रुपये लिटर आहे. मुंबईकरांना लिटरमागे पेट्रोलसाठी 90 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत पेट्रोल 90.34 तर डिझेल 80.51 रुपये प्रतिलिटर दर आहे. कोलकाता इथे पेट्रोल 85.19 रुपये लिटर तर चेन्नईमध्ये 77.44 रुपये लिटर पेट्रोलचे दर आहेत. नागपूर आजचा दर पेट्रोल 90.43 रुपये प्रतिलिटर तर कालचा दर 89.93 आणि आजचा दर डिझेल 79.42 रुपये लिटर, प्रतिलिटर तर कालचा दर 78.85.आधीच कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल दरवाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले होते आता तर कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

Comments are closed.