Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत जिल्हयात तीन मृत्यूसह 58 नवीन कोरोना बाधित तर 51 कोरोनामुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 07 डिसेंबर:- आज गडचिरोलीत जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8286 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7782 वर पोहचली. तसेच सद्या 416 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 88 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज तीन मृत्युमध्ये हनुमान नगर गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला तर 90 वर्षीय महिला आलापल्ली आणि 60 वर्षीय महिला गनपूर तालुका चामोर्शी अशा तीघांचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.32 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.02 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 58 बाधितांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 3, आरमोरी 2, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 37, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 51 रूग्णांमध्ये गडचिरोली 32, अहेरी 0, आरमोरी 7, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 8 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपुरी वार्ड 01, स्थानिक 02, कॉम्प ऐरिया 01, फॉरेस्ट कॉलनी 01, विवेकानंद नगर 01, कन्नमवार नगर 01, लाड दवाखाना जवळ 01, गोकुल नगर 01, नंदनवन नगर चामोर्शी रोड 01, करम टोला 01, आरमोरी रोड 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, सावरकर चौक आलापल्ली 02, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, अंतरजी 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये गणपूर 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस स्टेशन येरकड 37, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मालेवाडा 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.