Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखंडीत विज पूरवठा करीता कुरखेडा येथील गुरनोली फाट्यावर चक्काजाम आंदोलन.

सात तासानंतर मार्ग झाला मोकळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा ७ डिसेंबर:- कुरखेडा येथील गेवर्धा परिसरातील कृषीपंपाना २४ तास अखंडीत विज पूरवठा करण्यात यावा या मागणी करीता मागील दोन महिण्यापासून संघर्ष करणार्या शेतकऱ्यांना  आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने कुरखेडा- वडसा मार्गावरील गुरनोली फाट्यावर आज सकाळी ९ वाजेपासून चक्काजाम आंदोलन सूरू केले त्यामूळे रस्त्याचा दूतर्फा वाहनाचा रागां लागल्या होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेवर्धा विज फिडर वरील कृषी पंपाचा लाईन वर १६ तास लोड शेडिंग तर ८ तास विज पूरवठा करण्यात येत असल्याने रब्बी धान हंगाम धोक्यात आलेला आहे त्यामूळे या परीसरातील १० ते १२ गावातील मागील दोन महिण्यापासून विज वितरण कंपनीचा या धोरणाविरोधात विविध माध्यमाने मागणी व संघर्ष करीत आहेत मात्र कंपणी प्रशासन आश्वासन देत वेळकाढू पणा करीत असल्याने संतप्त शेतकर्यानी आज सकाळी ९ वाजेपासून गुरनोली फाट्यावर चक्काजाम आंदोलन सूरू केला आहे मागणी माण्य झाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकानी करीत आक्रामक भूमीका स्वीकारल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

यावेळी उपस्थीत उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर तहसिलदार सोमनाथ माळी ठाणेदार सूधाकर देडे साहायक पोलीस निरीक्षक समीर केदार उपविभागीय विज अभियंता मूरकूटे यानी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्ण केला मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहत आश्वासनावर विश्वास न ठेवत विज कंपनीचे जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी याना आंदोलन स्थळी बोलावण्याची मागणी करीत होते व त्यांचा तर्फे लिखीत आश्वासन मीळाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा भूमीकेवर ठाम असल्याने पेच निर्माण झाला होता मोर्चाचे नेतृत्व आमदार क्रिष्णा गजबे माजी जि प सदस्य सूरेंन्द्रसिंह चंदेल, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार विलास गावंडे माजी नगराध्याक्ष रविंद्र गोटेफोडे माजी प स सदस्य चागंदेव फाये,आशीष काळे,गणपत सोनकूसरे, विनोद खूणे, मनोहर लांजेवार दशरथ लाडे, भगवान डहाळे, गूणवंत कवाडकर जि प सदस्या गिता कूमरे, पुरषोत्तम तिरगम रोशन सय्यद हे करीत होते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुरनोली फाट्यावर लोडशेडिंगमुळे त्रस्त शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे कुरखेडा वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल सात तासानंतर सुरळीत करण्यात कुरखेडा पोलिसांना यश आले.

Comments are closed.