Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवनगर येथील झोपडपट्टी हटवु नये

Get real time updates directly on you device, subscribe now.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली०७ डिसें : येथील चामोर्शी मार्गावर वसलेली शिवनगर झोपडपट्टी
हटविण्यात येवु नये अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
पक्षाचे केद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात आज
झोपडपट्टी वासीयांच्या एका शिष्टमंडळाने गडचिरोलीचे उपवनसंरक्षक कुमार
स्वामी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.
मागील पाच सहा वर्षापासुन गोरगरीब लोक लहान लहान झोपड्या बांधुन वास्तव्य
करीत आहेत व मोलमजुरी आणि धुनीभांडी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
परंतु वनविभागाने नोव्हेंबर महिण्यात या झोपडपट्टी धारकांना अचानकपणे
नोटिस पाठवुन जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व
झोपडपट्टीवासी घाबरले असुन ऐन थंडीच्या दिवसात त्यांच्यासमोर निवाऱ्यांचा
मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महिण्यांपुर्वी संयुक्त मोजनी
करून आपल्या जागेची हद्द निश्चित केली होती व या हद्दीच्या बाहेरच
झोपड्यांचे बांधकाम नागरिकांनी केले आहे. त्यामुळे वनविभागाने या झोपड्या
हटविण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षणाच्या
निदर्शनास आणुन दिले व झोपड्या हटविण्याची कारवाई थांबवावी अशी विनंती
केली.
या झोपड्या हटविल्यास रिपब्लिकन पक्ष व झोपडपट्टी वासीयांतर्पेâ तीव्र
आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा रिपब्लिकन पक्षाने दिला आहे.
शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे,
कोषाध्यक्ष अशोक खोब्रागडे, तालुका अध्यक्ष प्रल्हाद रायपुरे, शिवनगर
झोपडपट्टी संघटनेचे नरेश वाळके, सुखदेव बावणे, भाऊराव थोरात, सुहानी
मेश्राम इत्यादी हजर होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.