Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शरद पवारांचे पत्र १६५ पानाचे असतांना फक्त दोनच पानाचे पत्र सोशल मीडियावर दाखवून भाजपकडून दिशाभूल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ०८ डिसेंबर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र १६५ पानाचे असून त्यातील दोनच पान  दाखवून भाजपाकडून दिशाभूल केली जात आहे शरद पवार यांनी त्यावेळी सर्वसमावेशक आणि व्यापक अशा राज्यात सूट दिली होती. मात्र भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे . अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषी मंत्री असताना एक पत्र वायरल केले आहे . यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय त्यांनी घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच केंद्राचा कायदा राज्यात नाही त्याच पद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले.

सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्न केले आहे. तसेच हमीभाव बदल कोणते आश्वासन दिले नाही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे . मात्र सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते . त्यामुळे कायद्यात हमीभावाची आश्वासन असायला पाहिजे होते. असे नवाब मलिक यांनी सांगितले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ते पत्र सूचक निर्देश नव्हते.

शरद पवारांनी राज्यात लिहिलेल्या पत्र हे सुचत नव्हते ते निर्देश नव्हते. एपीएमची अधिकार केंद्राकडे घेण्यासाठी  शरद पवार कधीही तयार नव्हते. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत .असे नवाब मलिक यांनी सांगितले अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.