Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’

जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 24 जुन – येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.