Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींना कोरोनाची लागण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पंढरपूर, दि. ९ डिसेंबर: रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहनही डिसले गुरुजींनी केलं आहे.

विशेष म्हणजे कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः डिसले गुरुजींनी दिली आहे. माझ्यात काही लक्षणे दिसून आल्यानंतर मी कोरोना चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह इतर नेत्यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतल्या अनेक प्रसार माध्यमांनीही त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घरी जाऊन सहकुटुंब सत्कार केला आणि पेढे भरविले होते. तसेच त्यांच्या घरातून देवेंद्र फडणवीसांनाही दरेकरांनी फोन लावून दिला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.