Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क सरन्यायाधिशाच्या आईची फसवणूक; अडीच कोटींचा गंडा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १० डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव तापस घोष असे आहे. बोबडे  कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपती आहे. त्यावर सीझन लॉन तयार केलेले आहे. त्या लॉनचा तापस घोष केअर टेकर होता. लॉनच्या आर्थिक व्यवहारात फसवणुकीचे प्रकरण २०१६ ते २०२० दरम्यानचे आहे. सुमारे १० वर्षापूर्वी तापस घोष याला लॉनच्या देखभालीचे काम सोपविले. त्यापोटी त्याला ९ हजार रुपये दरमहा पगार, व प्रत्येक बुकिंगवर कमीशन २५०० रुपये दिले जायचे. लॉनच्या बुकींगपोटी मिळणाऱ्या किरायाचा हिशेब तापस घोष आणि त्याची पत्नी पाहायचे. या लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे (९४) यांच्या नावे आहे. त्या वयोवृद्ध आणि आजारी आहेत. घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन लॉनच्या किरायापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेची हेराफेरी केली. त्यांनी बनावट पावत्या तयार करून रक्कम हडपली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. काही दिवसांपूर्वी ही फसवणूक बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलिसांनी घोष दाम्पत्याची चौकशी केली असता कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार केल्याची बाब पुढे आली. या आधारावरून मुक्ता बोबडे या वयोवृद्ध असल्याने त्यांच्या वतीने किरण विष्णुपंत देवपुजारी (७२) यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास १६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.