गोंडवाना विद्यापीठात अल्फा अकादमीच्या वेब डेव्हलपमेंट कोर्सच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक
गोंडवाना विद्यापीठात वेब डेव्हलपमेंट कोर्सचा भव्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हा प्रशासन, गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अल्फा अकादमी सुरू करण्यात आलेली असून त्या मध्ये प्रोफेशनल फुल-स्टॅक वेब डेव्हलपमेंट ही अभ्यासक्रम घेण्यात येत आहे.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांना अभ्यासक्रमात वेब साइट तयार करण्यासाठी लागणारे कौशल्य प्रदान करण्यात आले. पहिली बॅच चे यशस्वीपणे पार पाडल्यानंतर द्वितीय बॅच जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.
प्रोफेशनल फुल-स्टॅक वेब डेव्हलपमेंट हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर NASSCOM ची परीक्षा घेण्यात आलेली असून या अभ्यासक्रमात यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला घेण्यात आलेल्या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक प्रज्वल बावणे, द्वितीय पारितोषिक महेश ठाकरे आणि कुणाल कन्नाके यांना प्राप्त झालेले आहेत तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक ओजस डोळस, कौशिक घोटकर, हर्षदा गेडाम, उद्धव वासेकर, नरेश चलाख या विद्यार्थ्याना देण्यात आलेला असून उर्वरित विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
यावेळेस कार्यक्रमाला अल्फा अकॅडमी चे नोडल अधिकारी डॉ. कृष्णा कारू, सहायक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठातील डॉ. प्रशांत ठाकरे, लर्नकोचचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनीष तिवारी, अल्फा अकॅडमी चे शिक्षकवृंद आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. हा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जातो हे जाणून घेतले पाहिजे. गोंडवाना विद्यापीठाचा या भागाच्या विकासासाठीचा हा अनोखा प्रयत्न आहे.
Comments are closed.