Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छगन भुजबळ यांचा पुन्हा नवा एल्गार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक: दि, १८.डिसेंबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी    मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मतदार संघातील ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत एल्गार करण्याचा निर्णय  घेतला आहे.

नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली पुढील रणनिती जाहीर केली आहे. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींचा कैवार घेत राज्यात आंदोलन करीत फिरणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. सदर मेळाव्यात समतेचे चक्र उलट दिशेने नेणाऱ्यांनाच आपला विरोध असल्याचे  छगन भुजबळ म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छगन भुजबळ यांनी बोलताना म्हणाले  प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही. प्रश्न आहे तो  समाजाचे जे प्रश्न उभे राहतील. त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे ? मंत्रिपदं येतात जातात., किती वेळा आली गेली, विरोधी पक्षातही बसलो. विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं ना. त्याचं काय एवढं दुखं घेऊन बसायचे नाही.

छगन भुजबळ म्हणाले की ओबीसींनी तुम्हाला एवढे दिल्यावर असं का ? कशासाठी मला  मंत्रिपद नाही दिल असत तरी काही झाल नसत मी सभागृहात  लढणारा आहे आणि बोलणारा पण आहे. माझी इतकी  अहवेलना करण्याचं  काय कारण होत व  कुणासाठी असाही सवाल उपस्थित करीत याचे  शल्य मनात टोचतंय. मला अनेकांनी सूचना केल्या. असं करा. तसं करा. मी उद्या परवा मुंबईत जाणार आहे. तेथे  ओबीसीचे नेते, एल्गारचे नेते आहेत. देशातील आणि राज्यातील सर्वांशी चर्चा करून मला कदाचित पुढील पावले उचलावी लागेल. घाई करायची काही गरज नाही. विचारपूर्वक पुढील पाऊल उचलणार आहे असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भुजबळ म्हणाले की मी मंत्रिपदावर नसलो  तरी तुमच्यासोबत आहे मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे तुमचे प्रश्न आहेत. तिथे आपण एकजुटीने राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहणार. तुम्ही हिंमत ठेवा. वाट पाहा. तोपर्यंत आपलं काम सुरू ठेवा. यापुढे कदाचित आणखी काही संकटं येण्याचं नाकारता येत नाही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आहे. तुमच्यासोबत लढता लढता शेवटचा श्वास घेणार आहे.

Comments are closed.