Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मस्साजोग हत्त्याकांडiतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड :   मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याकांड प्रकरणास 22 दिवस उलटल्यावर तसेच त्यांची व त्यांचे कुटुंबातील जवळील नातलगांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश निघाल्याच्या दुसर्यास दिवशी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुणे सीआयडीला शरण आला.

मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. त्यानंतर त्यांचे  पडसाद राज्यभर उमटले. ठिकठिकाणी मोर्चे निघण्यास सुरुवात झाली. आरोपीची ठीकठीकानी नाकाबंदी करण्यात आली. त्यांची व त्यांचे कुटुंबातील जवळील नातलगांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश निघाल्याच्या  लगेच दुसर्यास दिवशी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड  हा मंगळवारी पुणे सीआयडीला शरण आला. सीआयडी पोलिसाने त्याला अटक करुन बीड जिल्ह्यातील केज येथील न्यायालयात मंगळवारी रात्री हजर  केले असता केज  न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.  बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली असल्याने त्याला काही वेळ ऑक्सिजन लावण्यात आले..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाल्मिक कराड याची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली तेव्हा त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्याची  त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावण्यात आले. त्यानंतर त्याला बरे वाटले. तो सकाळी ८.३० वाजता झोपेतून उठला. त्याने नास्ताही केला नाही. दहा वाजता त्याला वैद्यकीय नेण्यात आले. तसेच सकाळी १०.४५ वाजता त्याने आर्धी चपाती खाल्ली. रात्री त्याने जेवण केले नव्हते. आता त्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.

सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे वाल्मिकी कराड याची चौकशी करण्यासाठी  बीड शहर पोलीस ठाण्यात उपस्थित  झाले आहे. आरोपी वाल्मिक कराड याचा सीआयडी कोठडीचा आज पहिला दिवस आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास अधिक गती द्या

बंधाऱ्यामुळे जमीन येणार ओलिताखाली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.