Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने केली चिमुकलीची हत्या;

अनैतिक संबंधात पोटची मुलगीच ठरली अडचन !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर :  जिल्ह्यातील खापरखेडा येथील नांदा गावात राहणाऱ्या कु. मानसी चामलाटे या ३ वर्षाच्या  मुलीच्ची हत्त्या झाल्याची घटना दि 2 जानेवारीला उघडकीस आली होती. सदर घटना ही स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील नांदा शिवारात घडली.

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने जन्मदात्या आईने आपल्या अवघ्या ३ वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्त्या केली. मानसी चामलाटे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील नांदा शिवारात 2 जानेवारीला उघडकीस आली. गुनिता ताराचंद चामलाटे, वय 29 वर्षे, रा. नांदा व  प्रियकर राजपाल मालवीय, वय 32 वर्षे, रा. देवास, मध्यप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुनिता चामलाटे ह्या  कामानिमित्त खापरखेडा  हद्दीतील नांदा शिवारात आली होती. यादरम्यान मध्य प्रदेसतील देवास येथील राजपाल मालवीय याच्याशी त्यांचे सूत जुळले. मात्र, दोघांनाही मुलगी मानसी नकोशी होती म्हणुन प्रेमात अखंड डुबलेल्या आईने प्रियकराच्या मदतीने तीन वर्षांच्या मुलीला नांदा येथील राहत्या घरी गुनिता व राजपालने 26 डिसेंबरला मानसीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने व हाताने मारून निर्घृण हत्या केली. या हत्येचे बिंग फुटणार या भीतीपोटी गुनिता मुलगी मानसीला पती ताराचंद यांच्याकडे गोरेगावला नेले.

दरम्यान, ताराचंद व त्याची दुसरी पत्नी कल्पनाला मानसी खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अंत्यविधी दरम्यान आंघोळ करताना मानसीचे वडील ताराचंद व सावत्र आई कल्पनाला शंका आली. यावेळी त्यांना मानसीच्या डोक्यावर आणि शरीरावर मार दिसला. मानसीच्या शरीरावर आगीचे चटके दिसून आले. हा प्रकार पाहून तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय झाला. मात्र, त्यावेळी ते काहीही बोलले नाही. मानसीचा मृतदेह जमिनीत पुरून अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांनी मुलीची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केला होता. मात्र, तपासानंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा,

भाजप नेता रमेश बिधूडी यांचे वादग्रस्त विधान….. तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या गालांप्रमाणे बनवू !

बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.