Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ATMमधून ₹100 – ₹200 च्या नोटांबाबत RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई : देशातील सामान्य नागरिकांना व्यवहार करताना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे ₹100 व ₹200च्या नोटांची कमतरता. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) हा प्रश्न गांभीर्याने घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरातील किमान 75 टक्के ATMमध्ये ₹100 किंवा ₹200च्या नोटा असलेल्या कॅसेटचा समावेश अनिवार्य केला आहे. यानंतर 31 मार्च 2026 पर्यंत ही अट 90 टक्के ATMसाठी लागू केली जाणार आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय देशभरातील रोखीच्या छोट्या व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी घेण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील ‘व्हाईट लेबल’ ATMही या आदेशाच्या कक्षेत येणार असून, या ATMद्वारे विविध बँकांचे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार करू शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बँकांना दिली कार्यवाहीची मुदत..

सर्व बँकांनी व ATM सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी यासाठी आवश्यक सुधारणा व तांत्रिक व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेमुळे छोट्या रकमेचे व्यवहार अधिक सुलभ होतील, तसेच मोठ्या नोटा फुटविण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास टळेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

RBI च्या निर्णयाचे नागरिकांमध्ये समाधानाची लाट..

हा निर्णय जाहीर होताच सामान्य नागरिक व लघु व्यापार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, व्यवहारांसाठी नेहमीची असलेली अडचण दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.