Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन

"संवेदनशीलता व तत्परतेने काम करावे" – अॅड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रुग्णांना आता वैद्यकीय मदतीसाठी मोठ्या शहरांचा धावपळ न करता स्थानिक स्तरावरच मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, असे नमूद करत सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल यांनी उपस्थितांना संबोधित केले. “या कक्षामुळे गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या कक्षामार्फत गरजू नागरिकांना शासनाच्या वैद्यकीय योजना, धर्मादाय रुग्णालयांची मदत, तसेच प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांची माहिती व लाभ सहज उपलब्ध होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ही सुविधा गरजूंना तात्काळ मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करावे, हीच अपेक्षा आहे.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, तहसीलदार सचिन जैस्वाल, डॉ. मनोहर मडावी (मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख) यांच्यासह अन्य अधिकारी, नायब तहसीलदार व कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापनेमागील उद्दिष्ट :

गरीब व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी सहाय्य करणे धर्मादाय रुग्णालयांतर्गत मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवून देणे विविध आरोग्य योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे योजना लागू नसलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत उपलब्ध करून देणे

या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार असून, शासनाची आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून या कक्षाकडे पाहिले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.