Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मार्क्सबाबांच्या २०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन — भाई रामदास जराते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : भांडवलशाही व्यवस्थेतील दारिद्र्य, शोषण आणि विषमतेचा पर्दाफाश करून समाजात समता, न्याय आणि श्रमिकांच्या सत्तेचा विचार मांडणाऱ्या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता आणि वैचारिक क्रांतिकारक काॅ. कार्ल मार्क्स यांचा २०७ वा जन्मदिन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा कार्यालयात देखील मार्क्सबाबांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हा कार्यालय, मच्छी मार्केटजवळ, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे. कार्यक्रमात ‘मार्क्स कोण होता?’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून, यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी बिर्याणी भोजनदानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा, तालुका व गावस्तरीय पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे.

मार्क्सबाबांची जयंती ही केवळ एका विचारवंताचा जन्मदिन नसून, ती आहे नवसमाजाच्या उभारणीचा संकल्प दिवस असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.