सहपालकमंत्र्यांचा गडचिरोली दौरा; शाळा प्रवेशोत्सव आणि प्रशासकीय बैठकींसाठी उपस्थिती
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल २३ जून रोजी गडचिरोलीत; विविध कार्यक्रमांत राहणार सहभागी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ जून: राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे सोमवार, २३ जून २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
सकाळी ८.१५ वाजता: गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व विश्रांती.
सकाळी ८.४५ वाजता: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरखळा येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती.
सकाळी १०.३० वाजता: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीस सहभाग.
दुपारी १.३० वाजता: पुन्हा शासकीय विश्रामगृहात आगमन व विश्रांती.
दुपारी २.३५ वाजता: जिल्हा परिषद कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.
सायंकाळी ६.०० वाजता: विश्रामगृहात परत आगमन.
नंतर सोयीनुसार: रामटेककडे प्रयाण.
या दौऱ्यादरम्यान मंत्री जयस्वाल शैक्षणिक, प्रशासनिक व विकासविषयक बाबींवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed.