Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बर्थ डे पार्टी शेवटची ठरली, अपघातात पाच पैकी चार जणांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोक स्पर्श टीम 

चंद्रपूर 16 डिसेम्बर:- चंद्रपूर वरून वाढदिवसाची पार्टी करून घरी येत असतानाकाल राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु झाला आहे  तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मूल शहरातील रहिवासी असलेल्या स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) यांचा जागीच मृत्यु झाला तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर मुलं हे मूल येथील प्रतिष्ठीत व्यापारी घरातील असून प्रगती निमगडे हिचे वडील शिक्षक आहेत. चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून येत होते हे पाचही जण स्वताच्या MH 34 AM 9297 या गाडीने परत येत असताना शेतामधुन निघणाऱ्या ट्र्ँक्टरने धडक दिल्याने चौघाचाही जागीच घात झाला. अधिक तपास सुरू आहे.

हे पण वाचा :माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम कोरोना पॉझिटिव्ह!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली हुंदई क्रेटा गाडी ट्रॅक्टरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, हुंदई क्रेटा गाडीचा यात चुराडा झाला.रात्री अचानक जोरात आवाज झाल्यामुळे गावाकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमी मुलांना कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

चार तरुण मुलांचा अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळे मुल गावावर शोककळा पसरली आहे. चारही जणांवर आज मुल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.