Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदाबाद :- गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात निकटवर्तीय होते.

केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. केशुभाई पटेल यांनी १९९५मध्ये प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी १९९८ ते २००१ या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी २०१२ साली भाजप सोडून आपला ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१२च्या विधानसभा निवडणुकीत ते विसावदार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते पण नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे २०१४ रोजी त्यांनी राजीनामा दिला होता. पटेल यांच्या निधनाबद्दल सूरतचे भाजप खासदार दर्शन जारदोश यांनी लिहिले की, ‘गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख झालं. त्यांचं कौशल्य, पक्ष निष्ठा आणि गुजरातच्या राजकारणात त्यांचं असलेलं स्थान खूप मोलाचं होतं.’ पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी देखील शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.