Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी बांधवांना सडक्या तांदळाचे वाटप तात्काळ थांबवा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश..

श्रमजीवी संघटनेच्या मागणीची घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल..

लोकस्पर्ष न्यूज़ने अळया पडलेल्या, सडक्या तांदळाचे वाटप या प्रकरणाची  सर्वात आधी वेधले लक्ष .. मुख्यमंत्री यांनी घेतली बातमी ची  दखल .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क दि.29आक्टो 

कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल 7 महिन्यानंतर प्रति कुटुंब 20 किलोग्राम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते, हे तांदूळ अत्यंत नित्कृष्ट आणि सडके असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 20 दिवसांपूर्वी शासनाच्या निदर्शनास आणले होते, हे तांदूळ 2014-15 वर्षातील शिल्लक तांदूळ असून त्यांची विक्री होत नसल्याने ते आदिवासींना वाटप करण्यात येत आहेत हे अधिकाऱ्यांनी श्रमजीवीच्या आंदोलनात कबुल केले होते. याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून विवेक पंडित यांनी हे सडके तांदूळ त्यांना दाखवले होते. मात्र तरीही काल (दि.28) रोजी हेच तांदूळ पुन्हा पॉलिश करून वाटप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिवासी विकास महामंडळ अधिकार्यांचा डाव श्रमजीवी संघटनेने हाणून पाडला. रायगड जिल्ह्यातील वाकडी आणि पालघर जिल्ह्यातील भिनार या ठिकाणी या तांदळाच्या गाड्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडल्या. या पार्श्वभूमीवर आज पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एक अधिकाऱ्याने आदिवासी तांदूळ घेतात मग विरोध कशाला करता असे सांगताच संतप्त होऊन पंडित यांनी त्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली. आदिवासी माणसं आहेत,जनावरं नाही असे सांगत हे आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने हे वाटप बंद करण्याचे आदेश दिले आहेत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. श्रमजीवी शिष्टमंडळाने आदिवासींच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे यावेळी लक्ष वेधले. आदिवासी विकास महामंडळाकडून वाटप करण्यात येत असलेला तांदूळ हा अतिशय निकृष्ट व खाण्यास अयोग्य असल्याचे श्रमजीवी च्या कार्यकर्त्यांनी आठ ऑगस्ट रोजी शासनाच्या निदर्शनास आणले होते. याबाबतचे वृत्त लोक स्पर्श न्यूज ने प्रसारित केले होते. विशेष म्हणजे हे तांदूळ 2014-15 वर्षातील शिल्लक तांदूळ असून त्यांची विक्री होत नसल्याने ते आदिवासींना वाटप करण्यात येत आहेत हे अधिकाऱ्यांनी श्रमजीवीच्या आंदोलनात कबुल केले होते. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून विवेक पंडित यांनी हे सडके तांदूळ त्यांना दाखवले होते. मात्र तरीही काल (दि.28) रोजी हेच तांदूळ पुन्हा पॉलिश करून वाटप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिवासी विकास महामंडळ अधिकाऱ्यांचा डाव श्रमजीवी संघटनेने हाणून पाडला. रायगड जिल्ह्यातील वाकडी आणि पालघर जिल्ह्यातील भिनार या ठिकाणी या तांदळाच्या गाड्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडल्या. या पार्श्वभूमीवर आज पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एक अधिकाऱ्याने आदिवासी तांदूळ घेतात मग विरोध कशाला करता असे सांगताच संतप्त होऊन पंडित यांनी त्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली. आदिवासी माणसं आहेत,जनावरं नाही असे सांगत हे आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट सांगितले.

15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी, त्या पूर्वीच आदिवासींच्या किमान मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या दारात स्वातंत्र्याचा प्रकाश पोहचवण्याबाबत कटीबद्द राहणार असल्याचे आश्वासक विधान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबतचा तपशीलवार कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी विवेक पंडित यांनीच स्विकारावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिम जमतील आदिवासी विकास महामंडळाकडून देण्यात येत असलेल्या सडक्या तांदळाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी नाराजी व्यक्त करत असा तांदूळ वाटप करण्याचे तातडीने बंद करून दर्जेदार तांदूळ देण्याबत अधिकाऱ्यांना आदेश दिले.

खावटी बाबत झालेल्या दिरंगाई बाबत बोलताना लाभार्थ्यांना असलेल्या जातीच्या दाखल्याच्या अटी बाबत पंडित यांनी लक्ष वेधले, तातडीने याबाबत निर्णयावर येत खावटी साठी लादलेली जातीच्या दाखल्याची अट रद्द करत, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तयार करतील ती प्रमाणित लाभार्थ्यांची यादी ग्राह्य धरावी असे निर्देश यावेळी देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदिवासी लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही आदिवासी हालाखीचे जीवन जगत आहे, मूलभूत सुविधाही आदिवासींच्या दारात पोहचल्या नाहीत याबाबत पंडित यांनी खंत व्यक्त केली. 2022 या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत हे किमान प्रश्न तडीस नेण्याबात मुख्यमंत्री ठाकरे यांनी अश्वासित केल्याने पंडित यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. याबाबतचा परिपूर्ण कृती आराखडा त्यात करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांच्यावर सोपवली.

आदिवासी विकास महामंडळ हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे, हमी भाव खरेदी योजनेत जमा झालेले तांदूळ काळ्याबाजारात विकून रेशनवर बाहेरील राज्यातून नित्कृष्ट तांदूळ आणून वाटप केला जातो, याबाबत 4 वेळा अशा गैरव्यवहार करण्याऱ्या कारवाया श्रमजीवी संघटनेने उघड केल्या, गाड्या पकडल्या, गुन्हेही दाखल करण्यात आले, मात्र आताही महामंडळ आणि व्यापारी मिळून हा भ्रष्टाचार सुरूच आहे, हा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगत याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी यावेळी विवेक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष तथा आदिवासी विकास मंत्री के. सी.पाडवी आणि सचिवालयातील उचपदस्थ अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,बाळाराम भोईर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.