Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विनयभंग करून महिलेस दिली जीवे मारण्याची धमकी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, 26 डिसेंबर: एका दलित महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी जागदरी येथील तीन आरोपींविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी तालुक्यातील जागदरी येथे घडली. तालुक्यातील जागदरी येथील एक महिला शौचास गेली असता गावातीलच एका आरोपीने तिचा विनयभंग केला.

त्यानंतर त्या महिलेचे कुटुंबीय आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपी गजानन अर्जुनराव डोईफोडे, रामभाऊ अर्जुनराव डोईफोडे व राजू अर्जुनराव डोईफोडे यांनी महिला व तिच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मागील 23 डिसेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुद्ध अट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, डिगंबर चव्हाण हे करीत आहेत. दरम्यान 25 डिसेंबर रोजी साखरखेर्डा पोलिसांसोबत पोलिस अधिकार्‍यांनी जागदरी येथे भेट दिली. दरम्यान तीनही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.