Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हा क्रीडा पुरस्कार 2019-20 करीता अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 31 डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या हेतुने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत आहे. शासनाचे नियमावलीत सुधारणा करुन नविन शासन निर्णय निर्गमित केलेले असून पुरस्काराचे स्वरुप हे पुढील प्रमाणे आहेत. अ) प्रमाणपत्र ब) स्मृतिचिन्ह क) रोख रुपये 10 हजार .व गुणांकणाकरीता कनिष्ठ गटाच्या अधिकृत स्पर्धा तसेच शालेय, ग्रामीण व महिला स्पर्धांचा समावेश आहे.

वरील पुरस्काराकरीता गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणवंत क्रीडापटू, तीन (1 महिला, 1 पुरुष व 1 दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचेकडून विहित नमुन्यात दि.10 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरीता खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, वरिष्ठ व कनिष्ठ, अजिंक्य पद स्पर्धेत तसेच शालेय, ग्रामीण व महिला स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली असावी. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शकांनी गडचिरोली जिल्ह्यातील गत दहा वर्षात मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारातील वरीष्ठ, कनिष्ठ गटाच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्पर्धा तसेच शालेय, ग्रामिण व महिला राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केलेले असावेत व अर्ज करतेवेळी वय 35 वर्ष पुर्ण असावे. पुरस्काराकरीता 1 जुलै ते 30 जून या कालावधीतील व खालील कामगिरी विचारात घेतली जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अश्र्वारोहन, ॲथलेटीक्स, कॅरम, कुस्ती,गोल्फ, जलतरण (डायव्हींग व वाटरपोलो), तलवारबाजी, तायक्वाँडो, जिम्नास्टीक, ज्यूदो, धनुर्विद्या, नेमबाजी, टेनिस, टेबल – टेनिस, ट्रायथलॉन, पावरलिफ्टींग, बुद्धीबळ, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, वेटलिफ्टिंग, मल्लखांब, वूशू, शरीरसौष्ठव, सायकलींग, बीलीयर्ड ॲन्ड स्नुकर, स्केटींग, स्वॅश, आटयापाटया, कबड्डी, खो-खो, कयाकिंग/कॅनोईंग, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल,याटींग, रोईंग, हँडबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, साफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पेंटाथलॉन, बेसबॉल व स्पोर्टस क्लाईबिंग याच खेळातील कामगिरी विचारात घेतली जाईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तरी गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुकांनी अर्जाचा विहित नमुना व अधिक माहिती करीता कार्यालयीन कामाचे दिवशी व वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा व आपले परिपुर्ण अर्ज, दि. 10 जानेवारी 2021 पर्यंत या कार्यालयात सादर करावे. उशीरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

Comments are closed.