Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटणार ?

नूतन वर्षात मार्च महिन्यात दारू बंदी हटणार पालकमंत्री वडेट्टीवार यांची माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चिमूर डेस्क २ जानेवारी :- चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व वाढलेली गुन्हेगारी जिल्ह्यात कळीचा विषय ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कधी हटनार याकडे  जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या विषयावर काही नागरीकांनी प्रश्न विचारले असता येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील दारुबंदी हटनार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज कुळदैवत यांच्या दर्शनासाठी शुक्रवारी कन्या शिवानी सोबत आले असता बोलत होते.
अचानक नववर्षाच्या पर्वावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार २०२१ वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर वरून थेट चिमूरचे आराध्यदैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होवुन राज्य व जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांना सुखी समाधानाची मागणी करत नववर्षाचा प्रारंभ केला. श्रीहरी बालाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने व आदेशानुसार नवीन वर्षातील कार्याला सुरुवात करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मार्चनंतर हटणार असून १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत यावेळी काही नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विजय वडेट्टीवार माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वेळी श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त डाँ दीपक यावले, निलम राचलवार यांनी श्री बालाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्वागत केले, दरम्यान देवस्थानच्या नोंदवही मध्ये अभिप्राय लिहताना मंदिरातील व्यवस्था, स्वच्छता व सुरू असलेल्या कामाचे कौतुक करीत मंदिराच्या परिसरातील कामाची पाहणी केली.यावेळी कांग्रेसचे, जीप सदस्य, गजानन बुटके, भीमराव ठावरी, संजय डोंगरे, प्राचार्य सुधीर पोहनकर, राजेंद्र लोणारे, तुषार काळे,मनीष नंदेश्वर, राजु हिंगणकर, राजु डहारे, तुषार शिंदे, गिरीष भोपे उमेश हिंगे, सुनिल दाभेकर प्रमोद दांडेकर प्यारा बावणकर अमय नाईक राकेश साठोने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.