Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नीट परीक्षेत अव्वल आलेल्या कु.प्राची कोठारे हिचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोक्स्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली ३१ ऑक्टो :- गडचिरोली येथील शंकरराव कोठारे यांची मुलगी कु. प्राची कोठारे हिने नीटच्या परीक्षेत विदर्भातुन ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला तर ऑल इंडिया रँकिंग मध्ये भारतातुन 156 वा क्रमांक पटकावुन गडचिरोली जिल्ह्याचे नावलौकिक केले. तसेच विदर्भातून 32 वा क्रमांक पटकावला आहे.नक्षलग्रस्त जिल्हात मुला – मुलीचे शिक्षणाला महत्व देवून मुले अभ्यास करून समोर येत असल्याने कौतकास्पद असल्याचे बोलून प्रत्यक्ष खा.अशोक नेते व भाजपचे  प्रकाश गेडाम , यांच्या घरी भेट देवून कु. प्राची कोठारे  हिला  पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करुन तिला पुढील शैक्षणिक वाटचाली करिता मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवाजी कॉलेज चे  कुनघाडकर सर, प्राचीचे वडील शंकरराव कोठारे, आई कोठारे आणि  घराजवळील नागरिक उपस्थित होते. प्राची दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हात MBBS ची पदवीयशस्वी पूर्ण करून जिल्ह्यात सेवा करावी अशी अपेक्षा असून या यशाचे श्रेय  आपल्या यशाचे श्रेय  आई-वडील व शिक्षकांना दिले आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.