Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा 10 जानेवारी:- मेहकरचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा रात्री 12 चे दरम्यान जालना येथे अपघात होऊन मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र काल 9 ला संभाजीनगरला गेले होते. परत येताना जालना शहरातील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचे (क्रमांक चक 28 इघ 2777) टायर फूटून तीने रस्त्याच्या खाली 3 ते 4 पलटी घेत सरळ झाली. या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.

सुदैवाने आ.संजय रायमुलकर काल मेहकर येथे होते. तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आ.संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.