Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बर्ड फ्ल्यू: जिल्हा अजूनही सुरक्षित, प्रशासन अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, 10 जानेवारी:- देशातल्या काही राज्यांत बर्ड फ्ल्यूचे आगमन झाले असल्याने जिल्हा पशु संवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यात बर्डफ्ल्यु चे बाधित आहे का हे शोधण्यासाठी अधिकारी पोल्ट्री व्यवसायावर नजर ठेवून आहे. प्रत्येक तालुका स्तरावर सर्वेक्षण पथके देखील नियुक्ती करण्यात आले असून अजूनपर्यंत जिल्ह्यात बर्डफ्ल्यूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, ही जमेची बाब असून पोल्ट्री व्यावसायीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आधीच कोरोना त्यात बर्ड फ्ल्यू अशी अवस्था सध्याची आहे. कोरोना विषाणूमूळे सारेच परेशान झाले आहे. जगाला हादरवून सोडणारा हा विषाणू आता कुठे नियंत्रणात येत आहे. लसीचा ड्राय रन कालच जिल्ह्यात चार ठिकाणी घेण्यात आला. हे सावट कमी होत असतांना इतरत्र ‘बर्ड फ्ल्यू’ची चर्चा वाढली आहे. कावळे, पक्षी, मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण एकाएकी वाढल्यास बर्ड फ्ल्यूची साथ आहे असे निष्पन्न होत आहे. काही राज्यात तसे आढळून आल्याने केलेल्या तपासणीत पक्षांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याची बाब पुढे आली. केरळ, हिमाचल ही राज्ये आघाडीवर आहेत. तर राज्यालगत सिमा भागात रुग्ण आढळले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात तसे रुग्ण आढळून आले नसल्याचे साथरोग नियंत्रण विभाग सांगत आहे. असे असले तरी पावसापूर्वी वळण बांधण्याचे धोरण घेण्यात आले आहे. जि.प. पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षण पथके तालुका स्तरावर नियुक्ती केली आहे. दक्षता पथकाची निर्मिती करुन पोल्ट्री व्यवसायावर अधिकारी नजर ठेवून आहे. कोरोना काळात पोल्ट्री व्यवसाय कोलमडला होता. अगदी सुरुवातीला पोल्ट्रीकडे संशयाने पाहिल्या गेले. पुढे हे संशयाचे धुके निवळले. तर आता पुन्हा बर्ड फ्ल्यूचे सावट या व्यवसायावर घोंगावत आहे. पोल्ट्री व्यावसायीकांनी पूर्ण स्वच्छता पाळून पक्ष्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Comments are closed.