Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करा

-डॉ. आनंद बंग यांचे तोड़सा इलाक्यातील ४२ गावांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १२ जानेवारी: जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक आहे. दारूबंदी उठविल्यास विदेशी दारू गावात शिरकाव करेल. आरोग्याच्या प्रश्नासह गरिबी निर्माण होईल. तसेच ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण गावाचा विकास खुंटणार. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक करा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद बंग यांनी तोडसा इलाक्यात समाविष्ट ४२ गावांना केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटापल्ली तालुक्यातील तोड़सा येथे इलाका बैठकीत डॉ. आनंद बंग बोलत होते. यावेळी इलाका प्रमुख अध्यक्ष अड़वे गाड़वे,  गाव पाटिल तोड़सा रैजी गावडे, साई गावडे, तोड़सा सरपंच प्रशांत आत्राम, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, तोड़सा पट्टी इलाक्यातील ४२ गावातील गाव पाटिल व भूमय्या उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी डॉ. आनंद बंग यांनी उपस्थित गाव पाटिल व भूमय्या यांना जिल्हा दारूबंदी , दारूमुक्त निवडणुकीचे महत्व पटवून दिले. सोबतच वनहक्क कायद्याची सुद्धा माहिती दिली. वनहक्क कायद्यांतर्गत विविध योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तलाव खोलीकरण व शेतीला सुपीक करणे आदी योजनांची माहिती देत डॉ. आनंद बंग यांनी तोड़सा इलाक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Comments are closed.