Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायास १० वर्षाचा सश्रम कारावास.

Get real time updates directly on you device, subscribe now.

जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांचा न्यायनिवाडा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ जानेवारी:- सन 2010 मध्ये पिडिता ही दहाव्या वर्गात शिकत असताना आरोपी नामे विनोद शांताराम बावणे, पोलीस शिपाई रा. आरमोरी वय ३५ वर्ष याने पीडिताशी प्रेम संबंध जुळवून तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून दिनांक १८.०३.२०११ रोजी तिची संमती नसताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्याबरोबरच्या शारीरिक संबंधाची व्हिडिओ शूटिंग करून ठेवले आहे व सदर व्हिडिओ शूटिंग तो तिच्या आईवडिलांना दाखवतो असे म्हणून माहे मे २०१५ पर्यंत वेळोवळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.


पीडित मुलीने आरोपी विनोदला लग्न करण्यासाठी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी विनोदी याने दुसऱ्या मुलीशी दि. ६ मे २०१५ रोजी लग्न केले शेवटी पीडित मुलीने दिनांक २५-०८-२०१५ रोजी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपी विनोद शांताराम बावणे रा. मु.पो.ता. आरमोरी जि. गडचिरोली यांचेविरुद्ध फिर्याद दाखल केली. सदरच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम ३७६(२), ५०६ भांद्वी अन्वये दि. २९-०८-२०१५ रोजी गुन्हा क्रमांक ४८/२०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला दि. १७-१०-२०१५ रोजी अटक करण्यात आली. गुन्ह्याच्या तपास पूर्ण झाल्यानंतर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांचे न्यायालयात दोषारोप दाखल केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.