Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल कोश्यारी व आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा १५ तारखेला शुभारंभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १३ जानेवारी: श्रीराम जन्मभूमी वर भव्य मंदिर निर्माण करण्याचे कार्य श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तर्फे प्रारंभ झालेले आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरा करिता सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशाने न्यासा तर्फे घरोघरी संपर्क करून निधी समर्पणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी विदर्भ प्रांतातील प्रत्येक तालुका तथा ग्राम स्तरावर वेगवेगळ्या आयोजनांनी करण्यात येणार आहे . या निमित्त सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जूनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ प्रांत निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ नागपूरातील पोद्दारेश्वर राम मंदिर, येथून होणार आहे.

या निमीत्त १५ जानेवारी रोजी सकाळी ८.०० वाजता स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचे विमानाने नागपूरात आगमन होणार असून, दुपारी ४ वाजता मोहिते भागाच्या निधी समर्पण कार्यक्रमात बन्सल यांचे निवास स्थान “राम वाटिका”, वर्धमान नगर येथे उपस्थित राहतील, सायंकाळी ५.३० वाजता निधी समर्पण, गृहसंपर्क अभियानाच्या निमित्याने रामजी महाराज मठ, राऊत चौक, मस्कासाथ येथून आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज परिसरात गृहसंपर्क करीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणा करिता भिक्षा मागतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी संकलन केल्या जाईल. निधी संकलन पावती पुस्तक व कुपन च्या माध्यमातून केल्या जाईल. रुपये १०/-, रुपये १००/-, रुपये १०००/- च्या रकमेचे कुपन्स रहातील. व रूपये २०००/- च्या वरील निधी करिता पावती दिल्या जाईल, रुपये २०००/- ते २०,००० /- पर्यंत रोख रक्कम देता येईल. केवळ धनादेशा द्वारे मिळणाऱ्या निधीस कलम क्र.80 G(2) बी अंतर्गत आयकर सुट मिळेल. धनादेश वा रक्कम केवळ कार्यकर्त्यांनाच हस्तांतरीत करावे व पावती अथवा कुपन अवश्य प्राप्त करावे. अभियानाची व त्या संबंधी माहिती देण्यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूल, कॉंग्रेस नगर, नागपूर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा चे विदर्भ प्रांत कार्यालय सुरु करण्यात आले असून तेथे निधी संकलन व त्या संबंधी सहायता व माहिती उपलब्ध राहील विदर्भ प्रांत कार्यालय प्रमुख शशांक सोहनी, सह कार्यालय प्रमुख मनोज पाटील, अभियान समितीचे विदर्भ प्रांत कोषाध्यक्ष म्हणून विनय चांगदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व जिल्ह्यात कार्यालय प्रारंभ केले आहेत. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी अशी विनंती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र द्वारे करण्यात आली असल्याचे प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी कळविले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.