Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर महानगरच्या भाजपा पद्ग्रहण सोहळ्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा ना हंसराज अहिर यांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे जनसेवा करावी- खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर, दि. १३ जानेवारी: भारतीय जनता पार्टीमध्ये कोण कार्यकर्ता कोणत्या पदावर आहे याला महत्व नसून कोणता पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपले पद न पाहता सामान्य जनतेच्या हितासाठी किंवा सर्व सामान्य जनतेच्या समस्यासाठी कितपत आपले योगदान देतो व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो याला महत्व आहे. भाजपचा पदाधिकारी हा पदाची गरीमा न बाळगता पक्षाचे संघटन व  व लोकहिताची कामे करीत असेल तर तोच सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे व यासाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मला भाजपचे पद किंवा सदस्यत्व मिळाले आहे याचा वापर करून मी सर्वसामान्य जनतेची कामे करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन ही भावना आपल्या मनात ठेवावी  जेणेकरून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास हे ध्येय पूर्ण होऊ शकेल असे प्रतिपादन अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून विकास पुरुष राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा माजी खासदार हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष डॉ मंगेशजी गुलवाडे, भाजपा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, चंद्रपूर महानगराच्या महापौर राखीताई कांचार्लवार, उपमहापौर राहुलजी पावडे, महानगरचे संघटन महामंत्री राजेंद्रजी गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, महानगर महामंत्री ब्रिजभुशनजी पाझारे, रवींद्रजी गुरनुले, महिला आघाडी महानगर अध्यक्षा अंजलीताई घोटेकर, युवामोर्चा चे महानगर अध्यक्ष विशालजी निंबाळकर, तसेच विविध आघाडी चे अध्यक्ष, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पद्ग्रहण सोहळ्यात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज भैया अहिर व खा. अशोक नेते यांच्या हस्ते पद्ग्रहण सोहळ्यात सर्व पदाधिकारी यांना भेटवस्तू, पक्षाचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. ना. मुनगंटीवार व मा ना. हंसराज अहिरे  यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Comments are closed.