Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा नामविस्तार दिन आज मोठ्या उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद दि .१४ जानेवारी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा नामविस्तार दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अग्निशमक दलाकडून विद्यापीठ गेट समोरील पुतळा नामांतर शहिद स्तंभ यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष, स्वागत मंच, तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिगेट्स आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. महिला व मुलींसाठी स्वतंत्र कक्ष, मनपाकडून फिरते स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची व्यवस्था विद्यापीठ परिसरात केली गेली आहे. पोलीस व प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी गर्दी न करण्याचे आवाहन केले असुन गर्दीच्या नियोजनासाठी स्वयंसेवक, समता सैनिक दल यांना सोबत घेऊन व्यवस्थापन करण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या विद्यापीठाला त्यांचं नाव मिळावं यासाठी आंबेडकरी अनुयायांना सतरा वर्षांचा संघर्ष करावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 14 जानेवारी 1994 रोजी अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं. मराठवाड्यात उच्च शिक्षण घेण्याची सोय नसतल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादेत शिक्षणाची मुहूर्तमेढ करत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याआधी मराठवाड्यातील युवकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावं लागायचं आणि ते प्रत्येकाला शक्य होत नव्हतं. त्याकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची दारे खुली केली आणि गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्यामुळेच त्यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या या विद्यापीठाला त्यांचं नाव मिळाव अशी इच्छा व्यक्त होऊ लागली. 1976 पासून ही मागणी जोर धरू लागली असतानाच हळूहळू या मागणीचा आंदोलनात रूपांतर झालं आणि एक मोठा लढा उभा राहिला. सतरा वर्षाच्या संघर्षानंतर अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालं. 14 जानेवारी हा दिवस नामविस्तार दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोनाच्या महामारी मुळे नामविस्तार विस्तार दिनला सर्वांनी घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. या आव्हानाला आज मोठा प्रतिसाद दिसून आला. सकाळपासूनच कुठलेही राजकीय व्यासपीठ या परिसरात उभं करण्यात आलं नव्हतं. आंबेडकरी अनुयायांनी आपल्या घरूनच बाबासाहेबांचं अभिवादन केलं. त्यामुळे दरवर्षी गजबजलेला विद्यापीठ परिसर यांना मात्र बराचसा रिकामा होता.

Comments are closed.