Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नार्वेमध्ये कोरोनाची लस टोचल्यानंतर २३ जणांचा मृत्यू, फायझरच्या लसीवर प्रश्नचिन्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था दि १५ जानेवारी :- संपूर्ण जगात कोरोनावर लसीकरण सुरू आहे. जग लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा असताना एक वाईट बातमी समोर येत आहे . नार्वेमध्ये कोरोनावरील लस टोचल्यानंतर तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश वृद्ध रुग्णांचा समावेश आहे.

नार्वेमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती . त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यानंतर सरकारने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये वृद्ध आणि आजारी रुग्णांचा समावेश आहे . त्यांच्यासाठी लस टोचणे हे आधीच धोकादायक होते असे सरकारने म्हटले आहे. २३  मृतापैकी १३ जणांचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर दहा जणांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेनेदरम्यान चीनच्या तज्ञांनी फायझरची लस न वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. ही लस घाईघाईत बनवल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे . त्यामुळेच ही लस कोरोना थांबवण्यात अपयशी होत आहे असे त्यांनी म्हटले आहे .

Comments are closed.